Login

भुतबंगल्याचा कहर | भयकथा | भाग २

It A Story Of Haunted House Of Witch And A Family.
भुतबंगल्याचा कहर | भयकथा | भाग २

दुसऱ्या दिवशी विशाल सकाळी अनिकेतच्या शाळेची माहिती काढायला निघून गेला. सुगंधा घरच्या कामाला लागली. अनिकेत नुकताच उठून डोळे चोळत रूम बाहेर आला.

तो सुगंधाला हाक मारणार इतक्यात दारावरची बेल वाजली. अनिकेत ने जाऊन दरवाजा उघडला तर समोर विशालचा भाऊ साहील होता.

त्याला बघून अनिकेत आनंदाने जोरात ओरडला, "चाचू......" त्याचा आवाज ऐकून सुगंधा देखील बाहेर आली. साहिल बऱ्याच वर्षांनी त्याच शिक्षण पूर्ण करून आला होता. सुगंधाने त्याच स्वागत केलं, अनिकेतला त्याने उचलून घेतलं.

आत येऊन सुगंधाने त्याला पाणी प्यायला दिले व प्रवास कसा झाला विचारले. त्यावर त्याने प्रवास छान झाल्याचे सांगितले.

मध्येच अनिकेत बोलू लागला, "चाचु तू आता आमच्या सोबतच राहणार ना कायमचा? तुझी स्टडी संपली ना?"

त्याच बोलणं ऐकुन साहिल हसतच त्याला बोलू लागला,"हो रे आता मी इथेच राहणार कुठे नाही जाणार आपण खूप धमाल करू."

त्या दोघांचं बोलणं थांबवत सुगंधा मध्ये बोलू लागली,"हो ती धमाल नंतर करा आता साहिल भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन घ्या थकला असाल मी खायला नाष्टा करते काही तरी. अनी चल उठ चाचूला फ्रेश होऊदे तू पण अंघोळ करून घे चल." तिचं बोलणं ऐकून दोघेही उठून रूममध्ये निघून गेले.

संध्याकाळी छान आराम करून साहिल अनिकेत सोबत टेरेस वर बसून त्याच्या गप्पा ऐकू लागला. सुगंधा तिथेच त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. चहा घेत बोलत असताना साहिलची नजर तिथे जवळच असणाऱ्या एका जुन्या घरावर गेली.

ते बघून त्याने सुगंधाला विचारले,"वहिनी... ते कोणच घर आहे गं? इतकं जुनं कोणी राहतं की नाही तिथे? फारच मोठं दिसतंय."

त्याच बोलणं ऐकुन सुगंधा त्या दिशेला बघून थोडी गंभीर होऊन बोलू लागली,"नाही ते बऱ्याच वर्षांपासून मोकळच आहे. त्याला येथील लोकं भुतबंगला म्हणून ओळखतात. मला पण इतकस माहित नाही पण काल त्या शेजारच्या अबोलीच्या आई सांगत होत्या की तिथे एका म्हातारीचे भूत आहे म्हणे कोणीच तिथे जात नाही लहान मुलांना तिथून गायब करतात. म्हणून अनिला पण सांगून ठेवलंय तिथे जाऊ नको म्हणून."
अनिकेत तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता पण साहिलला तिच्या बोलण्यावर हसू आले त्याला ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता.

तो त्याचे हसू थांबवून बोलू लागला,"काय वहिनी तुम्ही पण ह्या अश्या गोष्टींवर विश्वास ठेवता. बघायला पाहिजे जाऊन तिथे वेळ मिळाला तर त्या म्हातारीची भेट घेऊन येतो." इतकं बोलून तो पुन्हा हसू लागला त्याला बघून अनिकेत देखील हसू लागला त्यांचं हसणं बघून सुगंधा तिथून निघून गेली.

संध्याकाळ पर्यंत विशाल घरी परतला. दिवसभर बाहेर राहून त्याने बरीच कामे संपवली होती. अनिकेतचे शाळेचे काम देखील झाले होते. तो आल्यावर विशाल त्याला भेटला त्याला बघून विशालला आनंद झाला. त्याची गळाभेट घेऊन त्याची विचारपूस केली. मग तो देखील फ्रेश होऊन साहिल सोबत गप्पा मारू लागला.

रात्रीच जेवण आटपून साहिल अनिकेतल घेऊन बाहेर फेरी मारायला निघाला. गेट बाहेर येताच शेजारच्या घरात त्याची एका मुलीशी नजरा नजर झाली. ती दीपा होती.

दोघे काही क्षण एकमेकांना बघू लागले. ती त्यांच्या घराच्या आवारात अबोली सोबत खेळत होती. तिला खेळताना बघून अनिकेतने तिला हाक मारली. तशी ती धावत त्याच्या जवळ आली तिच्या मागून दीपा देखील तिथे आली.

अनिकेतने साहिलची ओळख त्या दोघींना करून दिली,"हा माझा चाचू, तो त्याची स्टडी संपवून आजच परत आलाय आता तो कायम आमच्या सोबतच राहणार आहे." अनिकेत आनंदाने सगळ त्या दोघींना सांगत होता.

दीपा आणि साहिल एकमेकांकडे स्मित करत बघत होते. दीपा काहीशी लाजत होती. जणू ते एकमेकांना पहिल्या नजरेतच आवडू लागले होते.

दुसऱ्या दिवशी साहिल सकाळी सवयी प्रमाणे मॉर्निंग वॉक साठी निघाला. अजुन पुरेसा उजेड पडला नव्हता. तो फेरफटका मारत त्या घरा समोर आला. त्या जुन्या पडक्या घराला बघून त्याला वहिनीचे बोलणे आठवले.

तो स्वतःशीच बोलू लागला,"खरंच का इथे वहिनी म्हणाली तसं भयानक काही असेल? आता इथे आजूबाजूला कोणी नाही, बघतोच आत जाऊन इतक्या मोठ्या प्रोपर्टीला कोणी बदनाम करून ठेवलंय ते?"

त्याने घरात जाण्यासाठी दारावरचा धागा सोडला आणि दरवाजा ढकलून आत पाय ठेवणार इतक्यात मागून कोणी तरी त्याला आवाज दिला आणि तो जागीच थांबला.

"अरे इथे कुठे चाललास माहीत नाही का ह्या जागेबद्दल फार भयानक आहे म्हणतात." त्याने मागे वळून बघितलं ती दीपा होती. ती देखील मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती.

तिला बघून साहिल बोलू लागला,"हो माहित आहे तेच बघायचं होत नक्की काय गडबड आहे ते? तुझा विश्वास आहे का ह्या सगळ्यांवर?"

त्याच्या प्रश्नावर ती बोलू लागली,"नाही रे पण सगळे बोलतात म्हणून मानायच, बाय द वे गूड मॉर्निंग, जाऊदे ते चल जॉगिंग करू तुला मी शहर दाखवते." तिच्या बोलण्याला तो होकार देत दोघे तिथून निघून गेले पण त्यांच्याकडे आतून कोणी तरी नजर ठेवून घुर्गुरत हळूच पुटपुटल,"शिकार गेली हातची चांगली...."

उजडल्यावर अनीकेतला त्याचे नवीन मित्र खेळण्यासाठी बोलवायला आले. तो घाई घाईत त्याच्या सोबत क्रिकेट खेळायला निघून गेला. साहिल दीपा सोबत शहर फिरून चांगल्या गप्पा करून घरी आला होता. येऊन तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला.

अनिकेत त्याच्या मित्रांसोबत जवळच्याच एका मैदानात गेला. तिथे त्यांचा चांगलाच खेळ सुरू झाला. पण त्यांचं हे मैदान त्या भूतबंगल्याच्या नजरेत जवळच होत. त्या जागे शिवाय मुलांना खेळायला दुसरी जागा नव्हती म्हणून कोणी काही बोललं तरी मुलं तिथेच खेळायला जात असत.

अनीकेतच्या टीमला पहिली बॉलिंग करायची होती. म्हणून त्याला फिल्डींग साठी मागे एकट्याला लांब उभा केलं होत. त्यामुळे तो त्या घराच्या आणखीनच जवळ गेला.

ह्यांचा हा खेळ साहिल टेरेस वर चहा घेत बघत बसला होता. बघता बघता त्याचा लक्ष अनिकेतकडे गेलं. त्याला जाणवलं की अनिकेत खेळ सोडून भान हरपून एकटाच मैदान बाहेर चालत जात आहे. कोणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हत. तो त्या घराच्या दिशेला जात होता.

साहिलने आवाज देण्याचा प्रयत्न केला पण ते मैदान नजरेच्या टप्प्यात असाल तरी आवाज जण्या इतकं जवळ नव्हत. तो चहाचा कप तसाच ठेवून तिथे जाण्यासाठी धावत सुटला.

तिथे मैदानात पोहोचल्यावर अनिकेत त्याला कुठेच दिसत नव्हता. त्यांनी बाकी मुलांना विचारले पण कोणालाच काही माहीत नव्हते. मग त्याला आठवले की अनिकेत त्या घराच्या दिशेला जात होता. कसलाच विचार न करता तो सरळ त्या घरात गेला.

बाहेर दिवस होता तरी त्या घरात सर्वत्र अंधार पसरला होता. साहिल अनिकेतला हाका मारू लागला. पण समोरून त्याला काहीच प्रतिसाद येत नव्हता. पण तिथे त्याच्या शिवाय नक्की कोणी तरी आहे हे त्याला जाणवू लागल.

काही वेळात काय माहित का पण साहिल ने अचानक अनिकेतला हाका मारत हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली.

तेव्हा त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. तो त्या आवाजाच्या मागे जाऊ लागला. तिथे एका कोपऱ्यात अनिकेत त्याला बसून रडताना दिसला.

त्याने लगेच त्याला उचलून घेतले आणि तो तिथून निघू लागला.

तिथून जाताना मागून त्याला आवाज येऊ लागला,"थांब कुठे घेऊन जातो आहेस त्याला माझा घास आहे तो.... कधी पर्यंत वाचवशिल त्याला तो संपल्यात जमा आहे आता...." इतकं बोलून ते जे कोणी होत ते क्रूरपने हसू लागलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all